निशब्ध संध्याकाळ
अशी कातरवेळ
तिची आठवण
तिची प्रतीक्षा
विचारांचे मोहोळ
अस्वस्थ शांतता
तिची आठवण
तिची प्रतीक्षा
स्तब्ध सळसळ
हलकीच झुळूक
तिची आठवण
तिची प्रतीक्षा
हलकी रिमझिम
मातीचा सुगंध
तिची आठवण
तिची प्रतीक्षा
शैल
No comments:
Post a Comment