हलाहल अपमानाचे पाजुनी
जिवंत मारले मला
मरताच मानाच्या चंदनी
सरणात जाळले मला
होतो वेडा मुसाफिर मी
नव्हती क्षिती कुणाची
होतो प्रेमात धुंद मी
नव्हती भीती कुणाची
होतो वाटत प्रेम जेव्हा
ह्या विश्वात सारे
होते हसत मजला तेव्हा
वेडा म्हणत सारे
नव्हते कुणा मंजूर
माझे स्वतात लीन होणे
होते त्यांना मंजूर
त्यांच्या पुढे दिन होणे
जिवंत मारले मला
मरताच मानाच्या चंदनी
सरणात जाळले मला
होतो वेडा मुसाफिर मी
नव्हती क्षिती कुणाची
होतो प्रेमात धुंद मी
नव्हती भीती कुणाची
होतो वाटत प्रेम जेव्हा
ह्या विश्वात सारे
होते हसत मजला तेव्हा
वेडा म्हणत सारे
नव्हते कुणा मंजूर
माझे स्वतात लीन होणे
होते त्यांना मंजूर
त्यांच्या पुढे दिन होणे
No comments:
Post a Comment