जन्म देता, आपला अंश बघता
जो अभिमान जाणतो
त्याला मी बाप म्हणतो
समारंभ पाहता, अभिमानाने उर भरता,
जो सभागृह दणाणतो
त्याला मी बाप म्हणतो
चूक करता, कबुली देता
जो नेत्रात पाणावतो
त्याला मी बाप म्हणतो
चोरी करता, आईच्या पदराआड लपता,
जो फोकाने हाणतो,
त्याला मी बाप म्हणतो
बडवलेल्या पाठीवर , हळूच तेल लावता,
जो दुखात कणतो,
त्याला मी बाप म्हणतो
दिवे मालवता, कामात गढता,
जो घरासाठी खणतो,
त्याला मी बाप म्हणतो
वादळे येता, नौका हेलकावता
जो शिड सांभाळतो
त्याला मी बाप म्हणतो
शैल
जो अभिमान जाणतो
त्याला मी बाप म्हणतो
समारंभ पाहता, अभिमानाने उर भरता,
जो सभागृह दणाणतो
त्याला मी बाप म्हणतो
चूक करता, कबुली देता
जो नेत्रात पाणावतो
त्याला मी बाप म्हणतो
चोरी करता, आईच्या पदराआड लपता,
जो फोकाने हाणतो,
त्याला मी बाप म्हणतो
बडवलेल्या पाठीवर , हळूच तेल लावता,
जो दुखात कणतो,
त्याला मी बाप म्हणतो
दिवे मालवता, कामात गढता,
जो घरासाठी खणतो,
त्याला मी बाप म्हणतो
वादळे येता, नौका हेलकावता
जो शिड सांभाळतो
त्याला मी बाप म्हणतो
शैल