मी आणि माझा एकांत
बऱ्याचदा गप्पा मारतो
अनेक हव्याहव्याशा
आणि काही नकोशा
जेव्हा मला कोणी
न भेटतो
तेव्हाच तो मला
गाठतो
मग खूप गप्पा
सुरु होतात
काही नव्या
काही जुन्या
मी बऱ्याचदा त्याला
भूतकाळात नेतो
तो काही वेळेस
भविष्यकाळात डोकावतो
मी माझ्याबद्दल
बोलत राहतो
पण तो सर्वांचा विचार
करायला लावतो
पण त्या दिवशी
तो इतका बोलत होता
मनात काहूर आणि
जीव हलका होत होता
तो बोलतच काय
ओरडत होता
अन मी मुग गिळून
ऐकत होतो
धपापल्या जीवाने तिथून
धावत सुटलो
लोकलच्या कोलाहलात
मित्रांना भेटलो
त्याच बरोबर त्याने
हात सोडला
आता माझा जीव
भांड्यात पडला
फालतू विचारपूस करण्यात
वेळ चालला होता
म्हटले इतक्या गर्दीत
तो सतावणार नव्हता
No comments:
Post a Comment