काही लिहायचे आहेत,
काही बोलायचे आहेत
आहेत विलक्षण शब्द जरी,
बात आहे शब्दांच्या पलिकडली
काही घ्यायचे आहेत,
काही द्यायचे आहेत
आहेत किमती शब्द जरी,
बात आहे शब्दांच्या पलिकडली
काही स्मरायचे आहेत,
काही विसरायचे आहेत,
आहेत साधे शब्द जरी,
बात आहे शब्दांच्या पलिकडली
काही निरखायचे आहेत,
काही दुर्लक्ष्याचे आहेत,
आहेत सुंदर शब्द जरी,
बात आहे शब्दांच्या पलिकडली,
शैल
No comments:
Post a Comment