समोरच्या पेनेल वरचे सर्व मीटर बदलले
पण तो काही बदलला नाही
मी वेग आयुष्याचा वाढवला
म्हणून तो काही वेगात पळाला नाही
अन मी मंदावलो
म्हणून तो काही सावकाश झाला नाही
आयुष्याची सर्व चक्र बदलली
पण तो काही बदलला नाही
आतुरतेने तिची वाट पाहत होतो
म्हणून तो काही पुढे सरकला नाही
अन ती निघाली
म्हणून तो काही क्षणभर थांबला नाही
प्रेयेसी ते बायको हा बदल झाला
पण तो काही बदलला नाही
त्या भीषण सुनामी नंतर सर्व जग धपापले
म्हणून तो काही थबकला नाही
अन पार्लमेंट मध्ये आम्ही अख्खं अधिवेशन घालवलं
म्हणून तो काही धावला नाही
हिरोशिमा ते सुनामी नंतरचा जपान बदलला
पण तो काही बदलला नाही
शैल / $hail