Friday, November 27, 2009

नौका माझी

का अशी नौका माझी
      भरकटत असते
किनारा दिसत असला तरी
      शीड भरतच नसते


का अशी बंदराची ओढ माझी
      कुरतडत असते
किनाऱ्या जवळ असलो तरी
      नांगर पडतच नसते


का अशी छाती माझी
      धडधडत असते
मलमली स्पर्शात असलो तरी
      शांतता होतच नसते


का अशी स्वप्ने माझी
      फूलवीत असतो
सुंदर पहाट असली तरी
     झोप येतच नसते

No comments: