आज मी माझ्या हृदयावर
प्रेम करू लागलो
आज कळले मला कि
किती दमते ते
मला चालू ठेवण्यासाठी कधीच
नाही बंद पडते ते
आज मी माझ्या हृदयावर
प्रेम करू लागलो
आज कळले मला कि
किती माझ्यात गुंतते ते
जरी मंन माझे
नको त्यात पडते ते
शैल
का अशी नौका माझी
भरकटत असते
का अशी बंदराची ओढ माझी
कुरतडत असते
किनाऱ्या जवळ असलो तरी
नांगर पडतच नसते
का अशी छाती माझी
धडधडत असते
मलमली स्पर्शात असलो तरी
शांतता होतच नसते
का अशी स्वप्ने माझी
फूलवीत असतो
सुंदर पहाट असली तरी
झोप येतच नसते