Saturday, October 05, 2013

Rear View Mirror



काल संध्याकाळी ऑफिस मधून भरधाव वेगात परतत होतो,
   सहजच लक्ष समोरच्या Rear  View Mirror मध्ये गेले.
सर्व दिवसाच्या आठवणींचा धुरळा उडवत "त्याचा" सप्त अश्वांचा रथ
    निशे कडे निघाला होता
रोजच्या वेगात  Rear  View Mirror मध्ये बघणे काही होत नाही,
    आणि असे सुंदर दृश्य बघता काही येत नाही.
पण आज एवढ्या वेगात ते  सुंदर दृश्य नेत्रात आणि मनात टिपत होतो,
 त्या समोरच्या आरश्यात.

घरी आलो , तुमचे हे सगळे messages वाचले आणि 
      आयुष्याच्या वेगवान गाडीत मनाच्या  Rear  View Mirror मध्ये
आठवणींच्या अश्वांनी चौखूर धुरळा उडवला


$hail