धुंद अशा पावसात या
भिजतोय असा हा गार वारा
मनातील कोलाहलात या
धडधडातोय असा हा रान वारा
विजांच्या अशा कडकडाटात या
बरसवतोय असा हा गारा
मनातील काजळीत या
थरकापवतोय असा हा शहारा
रात्रीच्या अशा प्रहरात या
बेधुंद असा हा आसमंत सारा
मनातील अतृप्ततेत या
धगधगवतोय असा हा अंगारा
कवी शैल